नवी दिल्ली - देशभरात कोरोनाची लागण झाल्याने 937 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे, तर एकूण रुग्णांचा आकडा 29 हजार 974 वर पोहचला आहे. मागील 24 तासात 51 रुग्ण दगावले तर 1 हजार 594 नव्याने रुग्णांची नोंद झाली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
एकूण रुग्णांपैकी 22 हजार 10 अॅक्टिव्ह केसेस असून 7 हजार 26 रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. एकूण कोरोना बाधितांपैकी 23. 44 टक्के रुग्ण बरे झालेत. देशातल्या एकूण रुग्णांपैकी 111 जण परदेशी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली.
मागील 24 तासात 51 जणांचा देशात मृत्यू झाला. त्यातील 27 जण महाराष्ट्रातील, 11 गुजरातमधील, 7 मध्यप्रदेशातली, 5 राजस्थानातील तर एक जण जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.