महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली पोलिसांनी बनावट कॉल सेंटरचा केला फर्दाफाश, १२ जणांना अटक

१२ जणांच्या टोळक्यांनी ४ राज्यामधील ६ शहरांमध्ये जाळे पसरले होते. १४ बँक खाती देशातील ६ शहरांमध्ये आढळून आली आहेत.

बनावट कॉल सेंटर

By

Published : Sep 7, 2019, 7:07 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी शहरातील रोहीनी भागातील एका बनावट कॉल सेंटरचा फर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांना १२ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे १४ बँक खाती आढळून आली असून त्यामध्ये तब्बल १३ कोटींची रक्कम आहे. तसेच २२० जणांना त्यांनी गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.

बनावट कॉल सेंटरच्या माध्यमांतून नागरिकांची फसवणूक करण्यात येत होती. या १२ जणांच्या टोळक्यांनी ४ राज्यामधील ६ शहरांमध्ये आपले जाळे पसरले होते. १४ बँक खाती देशातील ६ शहरांमध्ये आढळून आली आहेत, अशी माहिती रोहीनीचे पोलीस उपायुक्त एस. डी मिश्रा यांनी दिली. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्या देशभरामध्ये कार्यरत आहेत. परराज्यातून काम करत असल्याने पोलीस तपासातही मर्यादा येतात. खासगी माहिती शिताफिने काढत लोकांना फसवण्यात या टोळ्या माहीर असतात. नोकरीचे अमिष दाखवून, आणि आर्थिक बाबींसदर्भात खोटी माहिती देवून लोकांना फसवण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details