नवी दिल्ली -कोरोना विषाणूच्या संसर्गाने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा प्रत्यय दिल्लीतील मुकुंदपुरच्या डी ब्लॉकमध्ये आला. येथे मृत्यू झालेल्या व्यक्तिचा मृतदेह तब्बल १८ तास तसाच पडून होता. ईएसआय रुग्णालयात सुरक्षा रक्षकाचे काम करत असलेल्या विजय सिंह यांचा घरातच मृत्यू झाला.
१८ तास घरातच पडून होता मृतदेह; कोरोनाच्या भीतीने कोणीही आले नाही पुढे
दिल्लीतील मुकुंदपुरच्या डी ब्लॉकमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तिचा मृतदेह तब्बल १८ तास तसाच पडून होता. मागील सात महिन्यांपासून डी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या विजय यांचा गुरुवारी मृत्यू झाला. घरमालकाने आसपासच्या लोकांना याबाबत कल्पना दिली. मात्र, कोरोनाच्या भीतीने कोणीही पुढे आले नाही.
मागील सात महिन्यांपासून डी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या विजय यांचा गुरुवारी मृत्यू झाला. घरमालकाने आसपासच्या लोकांना याबाबत कल्पना दिली. मात्र, कोरोनाच्या भीतीने कोणीही पुढे आले नाही. घरमालकाने जगजीवन आणि ईएसआय रुग्णालयाला याची माहिती कळवली. मात्र, त्यांच्याकडूनही मदतीसाठी कोणी आले नाही. यादरम्यान पोलीस वगळता कोणताही सरकारी व्यक्ती या भागात आला नाही.
मुकुंदपुर भागात आत्तापर्यंत एकदाही निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे विजय सिंह यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची शंका आसपासच्या रहिवाश्यांना आहे. त्यामुळे विजय यांचा मृतदेह उचलण्यासाठी कोणीही समोर आले नाही. विजय सिंह यांचा मृतदेह हातगाडीवर ठेऊन स्मशानापर्यंत नेण्यात आला. त्यांचा जावयाच्या मोठ्या भावाने चितेला अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.