महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 28, 2020, 4:47 PM IST

ETV Bharat / bharat

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दिल्लीतील ‘एम्स’मध्ये हलवलं

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना प्रकृती खालवल्याने त्यांना सोमवारी सरकारी रुग्णालयातून दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे हलवण्यात आले आहे.

सिंह
सिंह

नवी दिल्ली - उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना सोमवारी सरकारी रुग्णालयातून दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत सामान्य आहे. मात्र. त्यांच्या फुफ्फुसात संक्रमण पसरत आहे, असे डॉक्टर डॉ. एनएस बिष्ट यांनी सांगितले.

दिल्लीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री एम्समध्ये हलवण्यात आले. 18 डिसेंबरला मुख्यमंत्री रावत यांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रावत यांच्या व्यतिरिक्त त्यांची पत्नी व मुलगी यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले.

कोरोनाची बड्या नेत्यांना लागण -

कोरोनाची अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून काहींचा मृत्यूही झाला आहे. राज्यसभा खासदार अभय भारद्वाज यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ याच्या मंत्रिमंडळात असेलेले चेतन चौहान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथून खासदारकी भूषवलेले एच. वसंतकुमार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details