(ARIES) मेष-आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. भोजन नेहेमीच्या वेळेस घेता येणार नाही. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील.
(TAURUS) वृषभ- आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे-सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास व स्वादिष्ट भोजन ह्यामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आर्थिक फायदा संभवतो. आज वैवाहिक जीवनातील सौख्य प्राप्त होईल.
(GEMINI) मिथुन-आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र व कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपले बोलणे किंवा व्यवहार ह्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा अपघात संभवतो. आज आपला खर्च अधिक होईल. मानसिक चिंतेने मन त्रस्त होईल. वायफळ कामावर शक्ती खर्च होईल.
(CANCER) कर्क-आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीशी सुसंवाद साधू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. चिंता दूर होतील. मित्रांसह एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
(LEO) सिंह-आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. सरकारी कामात फायदा होईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. घर, जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतील.
(VIRGO) कन्या-आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.