महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आजचे राशी भविष्य...जाणून घ्या, काय म्हणते तुमची रास - dailyhoroscope

आजचे राशी भविष्य...जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस! काय म्हणते तुमची रास..

आजचे राशी भविष्य
आजचे राशी भविष्य

By

Published : Jan 7, 2020, 8:50 AM IST

मेष(ARIES)-आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर ह्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल व त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. नकारात्मक विचारा पासून दूर राहावे.

वृषभ(TAURUS)- आज खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक सुख शांती लाभेल. उत्तम दांपत्यजीवनाचा आनंद मिळेल. धनलाभाची अपेक्षा करू शकता.

मिथुन(GEMINI)- आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे - सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. मान - प्रतिष्ठेची हानी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खास शौक - मजा व मनोरंजन यावर खर्च होईल. बुद्धी शांत ठेवून वागावे लागेल.

कर्क(CANCER) - आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद व समाधान वाटेल. मित्र, पत्नी, संतती अशा सर्वांकडून आनंददायी बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. प्रवास व विवाहाचे योग आहेत. प्रणयाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. उत्तम वैवाहिक सुखाचा आनंद मिळेल.

सिंह(LEO) -आजचा दिवस नोकरी - व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलांकडून लाभ होईल. आजचा दिवस जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारांसाठी अनुकूल आहे. कला व क्रीडा क्षेत्रात कौशल्य दाखविण्यासाठी दिवस उत्तम आहे.

कन्या(VIRGO)- आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल. शरीर व मन एकदम स्वस्थ राहील.

तूळ(LIBRA)- आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. जलाशय व स्त्री वर्गापासून सावध राहावे. ईश्वराची भक्ती व गाढ चिंतन शक्ती मनाला शांती देईल.

वृश्चिक(SCORPIO) - आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणे व वाहन सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. दांपत्य जीवनात सुखद क्षणांचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्तीची भेट व धनलाभ होईल

धनू(SAGITTARIUS) - आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर व सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता व यश मिळेल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. मैत्रीणींची भेट होईल.

मकर(CAPRICORN)- आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. त्यांच्या भेटी रोमांचक ठरतील. शेअर - सट्टा यात लाभ होईल. संततीच्या समस्या मिटतील. मित्रांकडून लाभ होईल.

कुंभ(AQUARIUS) -आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य - प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल. स्वभावात हट्टीपणा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे.

मीन(PISCES)- आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. मित्रांसह लहानसा प्रवास कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

ABOUT THE AUTHOR

...view details