नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'वायू' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रातील संबंधित संस्थांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत 'वायू' चक्रीवादळाशी सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच, नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले.
गृहमंत्री अमित शाह यांचे वायू चक्रीवादळाशी सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश - meeting
शाह यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकांची सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांचा तसेच, अत्यावश्यक वेळी लोकांचे सुरक्षित स्थलांतरण या बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले. पिण्याचे पाणी, आरोग्य, वीज, संपर्क या बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शाह
शाह यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकांची सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांचा तसेच, अत्यावश्यक वेळी लोकांचे सुरक्षित स्थलांतरण या बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले. पिण्याचे पाणी, आरोग्य, वीज, संपर्क या बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे. २४x७ सर्व कंट्रोल रूम्स सुरू ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. गृह सचिव, भूशास्त्र सचिव, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.