महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये चक्रीवादळ 'वायू' अलर्ट; ४० रेल्वे रद्द, विमानसेवाही बंद - राष्ट्रीय आपत्ती निवारण दल

चक्रीवादळ 'वायू'च्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने खबरदारी घेताना आतापर्यंत ४० रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. भारतीय विमानसेवा प्राधिकरणानेही पोरबंदर, दीव, भावनगर, केशोद आणि कांडला येथील विमानसेवा बंद केली आहे.

गुजरात वायु अलर्ट

By

Published : Jun 12, 2019, 10:31 PM IST

अहमदाबाद - गुजरातमधील सौराष्ट्राच्या किनाऱ्यापासून ६०० किलोमीटर दक्षिणेकडे चक्रीवादळ 'वायू' आज रात्रीच्या सुमारास धडकण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासह राज्य सरकारने किनाऱ्यावरील जिल्ह्यात आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या आहेत.

नरेंद्र मोदी ट्वीट

चक्रीवादळ 'वायू' वेगाने गुजरातकडे जात आहे. याचा प्रभाव मुंबईत दिसून येत आहे. मुंबईत जोराच्या वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडत आहेत. गुजरातचे मुख्य सचिव जे. एन. सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, गुरुवारी सकाळच्या वेळी वेरावलजवळ चक्रीवादळ 'वायू' धडकण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीनुसार सौराष्ट्रच्या किनाऱ्यावरील भागात एनडीआरएफ दलांना तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफ भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलासोबत समन्वय राखून काम करणार आहे. परिस्थितीबाबत लोकांना सार्वजनिक माध्यमे, एसएमएस आणि व्हॉटसअॅपद्वारे जागरुक केले जात आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की यामुळे किनाऱ्यावरील भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे.

एनडीआरएफचे बचावकार्य

चक्रीवादळ 'वायू'च्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने खबरदारी घेताना आतापर्यंत ४० रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. तर, २८ रेल्वेंना काही काळासाठी बंद ठेवल्या आहेत किंवा त्यांच्या मार्ग कमी केला आहे. याआधीही पश्चिम रेल्वेने किनाऱ्यालगतच्या भागातील रेल्वे २ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

विमान प्राधिकरणाचे ट्वीट

भारतीय विमानसेवा प्राधिकरणानेही पोरबंदर, दीव, भावनगर, केशोद आणि कांडला येथील विमानसेवा बंद केली आहे. आज रात्रीपासून ते उद्या मध्यरात्रीसाठी विमानसेवा बंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details