महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'महा'चक्रीवादळ : महाराष्ट्र, गुजरातसह 'या' किनाऱ्यांना बसणार तडाखा - गुजरात दमण आणि दीव

६ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला 'महा' चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गुजरात, महाराष्ट्र, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्ये याचा परिणाम होणार आहे. या काळात समुद्र खवळलेला राहणार असून १ मीटर उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे.

'महा'चक्रीवादळ

By

Published : Nov 5, 2019, 10:14 AM IST

Updated : Nov 5, 2019, 10:49 AM IST

मुंबई -भारतीय हवामानशास्त्र विभागाने हवामानाविषयी ताजी माहिती जारी केली आहे. यानुसार, ६ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला 'महा' चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गुजरात, महाराष्ट्र, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्ये याचा परिणाम होणार आहे. या काळात समुद्र खवळलेला राहणार असल्याने येथील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरातमध्ये अनेक ठिकाणी थोड्या ते मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, जुनागढ, गीर सोमनाथ, अमेरली, भावनगर, सुरत, भरूच, आनंद, अहमदाबाद, बोताद, पोरबंदर, राजकोट येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापैकी भावनगर, सुरत, भरूच, आनंद, अहमदाबाद बोताद आणि वडोदरा येथे ७ नोव्हेंबरला मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

'महा'चक्रीवादळ

महाराष्ट्रातही थोड्या ते मध्यम प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही ७ नोव्हेंबरला जोरदार पावसाची शक्यता असल्याचे कळवले आहे. रायगडमध्ये ८ नोव्हेंबरला मुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे.

गुजरात, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली येथे ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवला आहे. ६ नोव्हेंबरच्या सकाळी तो ईशान्य अरबी समुद्रात ६० किलोमीटर प्रतितास एवढा राहील. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर आणि किनाऱ्याजवळच्या भागांमध्ये या वाऱ्याचा वेग वाढत जाऊन ७० ते ८० किलोमीटर प्रतिसांपर्यंत जाऊ शकतो. जुनागढ, गीर सोमनाथ, दीव आणि अमरेली जिल्ह्यांत किनाऱ्यालगत तो ताशी ६० ते ७० किलोमीटरपर्यंत राहील. तर, भावनगर, सुरत, भरूच, आनंद, अहमदाबाद, बोताद, पोरबंदर आणि राजकोट जिल्ह्यांत किनाऱ्याजवळ तो ताशी ८० किलोमीटरच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरच्या सायंकाळनंतरच्या १२ तासांमध्ये अशा प्रकारच्या वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात किनारपट्टीवर ६ नोव्हेंबरच्या सकाळपासून वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग सायंकाळपर्यंत ५० ते ६० किलोमीटर प्रतितासांपर्यंत आणि पुढील १२ तासांमध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये ७० किलमोमीटर प्रतितासांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.

समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग तब्बल १७५ ते १८५ किलोमीटर प्रतिसास असू शकतो. तो ताशी २०५ किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. तेथील परिस्थिती वाऱ्याच्या वाढत्या वेगाबरोबर अधिक गंभीर होऊ शकते. ती पुढील ६ तासांपर्यंत तशीच राहू शकते, असे सांगण्यात आले आहे. वाढळामुळे समुद्रात १ मीटरपर्यंतच्या उंचीच्या लाटा निर्माण होऊ शकतात. भावनगरच्या किनापट्टीवरील सखल भागांना एक मीटर उंचीच्या लाटांचा तडाखा बसू शकतो. तर, जुनागढ, गीर सोमनाथ, अमेरली, सुरत, भरूच, आनंद, अहमदाबाद, पोरबंदर येथील कमी उंचीच्या किनाऱ्यांना अर्ध्या ते एक मीटर उंचीच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो.

रविवारी भारतीय तटरक्षक दलाने ७ जहाजे आणि २ विमाने गुजरातच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱया बोटींना जवळच्या किनाऱ्यावर परतण्याची सूचना देण्यासाठी तैनात केली आहेत. तटरक्षक दलाने चक्रीवादळाचा इशारा देणारे ट्विट केले होते.

Last Updated : Nov 5, 2019, 10:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details