महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गयामध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेत गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज - gaya

गयामध्ये आयोजित निवडणूक सभांमध्ये मोदींच्या भाषणापूर्वीच जमलेल्या गर्दीत गोंधळ सुरू होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेत गेली. रालोआने भाजप खासदार हरी मांझी यांचे तिकिट रद्द करून विजय कुमार मांझी यांना येथील मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.

गया

By

Published : Apr 2, 2019, 6:31 PM IST

Updated : Apr 2, 2019, 7:11 PM IST

गया - गयामध्ये आयोजित पीएम मोदी पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचार सभेत अचानक गोंधळ माजला. यानंतर पोलिसांनी अनियंत्रित झालेल्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार लाठीचार्ज केला. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये दोन सभांना संबोधित करण्यासाठी पोहोचले. ही पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मोदींची बिहारमधील पहिली सभा आहे.

गया

गयामध्ये आयोजित निवडणूक सभांमध्ये मोदींच्या भाषणापूर्वीच जमलेल्या गर्दीत गोंधळ सुरू होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेत गेली. रालोआने भाजप खासदार हरी मांझी यांचे तिकिट रद्द करून विजय कुमार मांझी यांना येथील मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मोदी गया येथील सभेत विजय कुमार मांझी यांच्यासाठी मते मागण्यासाठी येथे येणार आहेत. मोदी येथे येण्याआधी जमुईला पोहोचले.

व्यासपीठावरून आवाहन केल्यानंतर गर्दी शांत

व्यासपीठावरून भाजप ने नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यानंतर गर्दी शांत झाली. येथे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तैनात आहे. हजारोंच्या संख्येने येथे मोदी समर्थक आले आहेत. जमुई येथे पोहोचण्यासाठी मोदी गयाकडे निघाले आहेत.

Last Updated : Apr 2, 2019, 7:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details