नवी दिल्ली -गाझियाबादच्या सिहानी परिसरात भरदिवसा एका व्यक्तीला चोरांनी तब्बल अडीच लाखांना लुटल्याची घटना घडली आहे. सबंधित व्यक्ती एका तेल व्यापाऱ्याकडे कामाला होता. या व्यापाऱ्याचे पैसे घेऊन दुकानाकडे येत असताना चोरांनी त्याला लुटले. राजकुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. राजकुमार यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ते वसुलीचे पैसे घेऊन दुकानाकडे येत होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या हातातली बॅग हिसकाऊन घेत पळ काढला. चोरांनी यावेळी हेल्मेट घातले होते. दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर आता पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
गाझियाबादमध्ये तेल व्यापाऱ्याला भरदिवसा अडीच लाखांना लुटले.. - गाझियाबाद गुन्हे वृत्त
गाझियाबादच्या सिहानी परिसरात भरदिवसा एका व्यक्तीला चोरांनी तब्बल अडीच लाखांना लुटल्याची घटना घडली आहे. सबंधित व्यक्ती एका तेल व्यापाऱ्याकडे कामाला होता. या व्यापाऱ्याचे पैसे घेऊन दुकानाकडे येत असताना चोरांनी त्याला लुटले. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भरदिवसा लुटले तेल व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये
ही घटना जेव्हा घडली तेव्हा या परिसरात मोठी वर्दळ होती. मात्र अशाही परिस्थितीमध्ये भरदिवसा चोरांनी पैशांची बॅग घेऊन पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. अशा घटना या परिसरात नेहमीच होत असतात असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका मोठ्या चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर देखील अशा घटना सातत्याने होत असमुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.