महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हा पहा.. १.५ सेमी उंचीचा 'मेड इन इंडिया विश्वकरंडक'

मंगळवारी बांग्लादेशाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवत विश्वकरंडकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारतातील क्रीडा रसिकांच्या मनात क्रिकेटला वेगळे स्थान आहे. सराफ रेवणकर यांनी बनवलेली विश्वकरंडकाची मिनी प्रतिकृती देशातील क्रिकेट प्रेमाचे प्रतीकच ठरेल.

मेड इन इंडिया विश्वकरंडक

By

Published : Jul 3, 2019, 6:07 PM IST

बंगळुरू - सध्या इंग्लडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेची सर्वत्र धूम आहे. विश्वकरंडक कोण जिंकणार, अंतिम सामन्यात कोणासोबत कोणाचा मुकाबला होणार या चर्चांना सध्या चांगलाच रंग आला आहे. यातच बंगळुरूच्या एका सराफ व्यापाऱ्याने केवळ १.५ सेमी उंचीची विश्वकरंडकाची सोन्याची प्रतिकृती बनवली आहे.

मेड इन इंडिया विश्वकरंडक

बंगळुरू येथील सराफ नटराज रेवणकर यांनी हा विश्वकरंडक बनवला आहे. हा 'मिनी वर्ल्ड कप' त्यांच्या पेढीवर आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. हा करंडक इतका छोटा आहे की, अगदी बोटाच्या पेराच्या तळभागावर बसू शकतो. याचे वजन ०.४९ ग्रॅम इतके आहे. इतक्या छोट्या विश्वकरंडकाला पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मेड इन इंडिया विश्वकरंडक
मंगळवारी बांग्लादेशाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवत विश्वकरंडकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारतातील क्रीडा रसिकांच्या मनात क्रिकेटला वेगळे स्थान आहे. आता विश्वकरंडक स्पर्धेमुळे देशवासियांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सराफ रेवणकर यांनी बनवलेली विश्वकरंडकाची मिनी प्रतिकृती देशातील क्रिकेट प्रेमाचे प्रतीकच ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details