महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीवर असे होतेय काम

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनी मिळून कोरोवरील लस तयार करत आहेत. AZD1222 असे या लसीला नाव देण्यात आले आहे. लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी आणि जगभरात पुरवठा करण्यासाठीही अस्त्राझेनेकाने सीरमबरोबर हातमिळवणी केली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Nov 27, 2020, 11:05 AM IST

Updated : Dec 4, 2020, 1:21 PM IST

हैदराबाद - ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनी मिळून कोरोवरील लस तयार करत आहेत. AZD1222 असे या लसीला नाव देण्यात आले आहे. लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी आणि जगभरात पुरवठा करण्यासाठीही अस्त्राझेनेकाने सीरमबरोबर हातमिळवणी केली आहे. ही लस सध्या विकासाच्या टप्प्यावर असून कोरोनाचे संकट दुर करण्यासाठी संपूर्ण जगाचे या लसीकडे लक्ष लागले आहे. सोबतच सीरम इन्स्टिट्यूट कंपनी कोविशील्ड ही लस भारतात तयार करत आहे.

कोरोना लस निर्मिती

ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोविड १९ ही लस प्रोफेसर सारा गिल्बर्ट, अ‌ॅन्ड्र्यू पोलार्ड, तेरेसा लामबे, डॉ. सँडी डगलसस, कॅथरिन ग्रीन आणि अ‌ॅड्रीन हिल यांच्या नेतृत्वाखाली तयार करत आहे. या पथकात ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांचाही समावेश आहे, ज्यांनी २०१४ साली इबोला संसर्गावर लस निर्मितीत सहभाग घेतला होता.

इंग्लमधील लसीच्या चाचणीचे निकाल

कोविशिल्ड ही लस सीरम कंपनी पुणे येथील प्रयोगशाळेत तयार करत आहे. यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीचे सहकार्यही घेण्यात येत आहे. इंग्लडमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी ब्राझील, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि इंग्लमध्ये घेण्यात आली आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून भारतातील चाचणीचा खर्च उचलण्यात येत आहे. तर सीरमकडून लसनिर्मितीसाठी लागणारा इतर खर्च करण्यात येत आहे. लसीचे काही प्रमाणात डोसची निर्मितीही करण्यात आली आहे.

कंपनीने आत्तापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेतल्या असून आता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या प्रगती पथावर आहेत. कोरोना लस पूर्णपणे तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने लसीचे उत्पादन करण्यात येईल त्यासाठीची तयारीही सुरू आहे. सुरुवातील कोरोना योद्ध्यांनाच लस देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

स्वस्तात आणि सार्वत्रिकरित्या लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न

कोविशील्ड लसीच्या भारतातील तीसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी पूर्ण झाल्याचे आयसीएमआर आणि सीरमने जाहीर केले आहे. सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या भारतातील १५ ठिकाणी सुरू आहेत. इंग्लडमधील लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून त्यांचे निकाल आले आहेत. भारतातील चाचण्यांचेही निकाल काही दिवसांत समोर येणार आहेत. कोरोनावरील लसही स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध व्हावी, असे सीरम कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. पुढील वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाची लस बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जगभरातील कोरोना लस निर्मितीची स्थिती

लसीचे नाव किंमत (डॉलरमध्ये) देश अचूकता(%) कंपनी कधी बाजारात येणार

ChAdOx1/Covishield

३ ते ४ भारत/स्वीडन/इंग्लड ९० टक्के ऑक्सफर्ड, अस्त्राझेनेका, सीरम डिसेंबर (पहिल्यांदा इंग्लडमध्ये)
BNT162b2 mRNA २० अमेरिका, जर्मनी ९५ टक्के फायझर, बायोएनटेक डिसेंबर (पहिल्यांदा अमेरिकेत)
mRNA २५ ते ३७ इंग्लड ९४.५ टक्के मॉडेर्ना, NIH डिसेंबर-जानेवारी(२०२१) पहिल्यांदा इंग्लमध्ये
Ad26 अमेरिका जॉन्सन अ‌ॅन्ड जॉन्सन, बेथ इस्त्रायल
Gam-Covid-Vac १० रशिया ९५ टक्के गमालिया रिसर्च इन्स्टिट्यूट
Ad5 चीन कॅनसिनो बायो, अ‌ॅकॅडमी ऑफ मिलिटरी
Nicotiana benthamiana कॅनडा अनहुई झिफेई आणि लाँगकॉम
Wuhan vaccine चीन सीनोफार्म
CoronaVac चीन सीनोवॅक बायोटेक
कोवॅक्सिन इंडिया भारत बायोटेक, आयसीएमआर
स्पुटनिक व्ही २० पेक्षा कमी 95 टक्के रशियन संरक्षण मंत्रालय, गमालिया रिसर्च इन्स्टिट्यूट
Last Updated : Dec 4, 2020, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details