नवी दिल्ली : रविवारी देशात सात लाखांहून अधिक कोरोना चाचण्या पार पडल्या. ही एका दिवसातील चाचण्यांची सर्वोच्च संख्या आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सहा लाखांवर चाचण्या होत होत्या. आज मात्र आधीचे सर्व उच्चांक मोडत ७ लाख १९ हजार ३६४ चाचण्यांची नोंद झाली.
जास्त प्रमाणात चाचण्या झाल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही जास्त नोंदवली गेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमधील आरोग्य व्यवस्थांना ट्रॅकिंग, आयसोलेशन आणि परिणामकारक उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्राची टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचे अनुकरण करण्यासही राज्यांना सांगण्यात आले आहे.