महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४७ लाखांवर; तर ३७ लाख रुग्ण झालेत कोरोनामुक्त - भारत कोरोना रुग्ण

काल दिवसभरात एकूण 1,114 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 78 हजार 586 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 47 लाख 54 हजार 357 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 73 हजार 175 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

COVID LIVE: Over 37 lakh COVID-19 patients have recovered in India: Health Ministry
देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४७ लाखांवर; तर ३७ लाख रुग्ण झालेत कोरोनामुक्त

By

Published : Sep 13, 2020, 10:40 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 94 हजार 372 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,114 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 78 हजार 586 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 47 लाख 54 हजार 357 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 73 हजार 175 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 37 लाख 2 हजार 596 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 10 लाख 71 हजार 702 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 5 कोटी, 62 लाख, 60 हजार 928 एवढी झाली आहे.

हेही वाचा :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा एम्समध्ये भर्ती

ABOUT THE AUTHOR

...view details