महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील रुग्णांची संख्या नऊशेपार, आतापर्यंत २१ बळी.. - कोरोना व्हायरस भारत

आतापर्यंत देशभरात एकूण ९१८ रुग्ण आढळले असून, यांपैकी ८१९ अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी ७९ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, २१ जणांचा यात बळी गेला आहे.

covid-19-toll-crosses-900-in-india-19-deaths-so-far
देशातील रुग्णांची संख्या नऊशेपार, आतापर्यंत २१ बळी..

By

Published : Mar 29, 2020, 10:13 AM IST

नवी दिल्ली- देशात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ९१८ रुग्ण आढळले असून, यापैकी ८१९ अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

देशातील एकूण रुग्णांपैकी ७९ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, २१ जणांचा यात बळी गेला आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या वाढतच चालली आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाचे २८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता १८१ वर पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे २६ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

महाराष्ट्रापाठोपाठ देशात केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. केरळमध्ये आतापर्यंत १६८ रुग्ण आढळून आले असून, ११ जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच, आतापर्यंत एक बळी गेला आहे.

हेही वाचा :कोरोना युद्ध: 'पंतप्रधान केअर फंड' स्थापन, मदत करण्याचे मोदींचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details