हैदराबाद - भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर रविवारी 90 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हा नविन विक्रम झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. मागील 24 तासांत 62 हजार 77 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर याबरोबरच 50 हजार 129 नविन बाधितांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
अहवालानुसार, सलग तिसर्या दिवशी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखांच्या खाली आली आहे. सध्या देशात 6 लाख 68 हजार 154 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा दर 8.50 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत देशात 1 लाख 18 हजार 534 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात आतापर्यंत 70 लाख 78 हजार 123 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेले रुग्ण आणि अॅक्टिव्ह केसेसमधील तफावत 64 लाखांपर्यंत (64,09,969) गेली आहे.
मागील एका आठवड्यापासून 1 हजार पेक्षा कमी मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. 1 हजार 100 पेक्षा कमी मृत्यूसंख्येची नोंद 2 ऑक्टोबरला करण्यात आली होती. देशात सध्या 2 हजार लॅब्समध्ये नमुना चाचणी सुरू आहे. सुरुवातीला पुण्यात एक लॅबची सुरुवात झाली होती. त्यानंतर आज देशात 2 हजार 3 लॅब्स आहेत. यात 1 हजार 126 सरकारी तर 877 खासगी लॅब्सचा समावेश आहे.
- मध्यप्रदेश -
सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात आता हवामानात बदल झाल्याने स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूच्या संभाव्य धोक्याशी सामना करण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच कोणतीही घटना टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
आरोग्य संचालनालयाने राज्यातील सर्व मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी तसेच सिव्हिल सर्जन यांना पत्र लिहिले आहे, हवामानातील बदलामुळे लोकांवर स्वाइन फ्लू हंगामी इन्फ्लूएंझा (एच 1 एन 1) होण्याची शक्यता वाढली आहे.
- जम्मू आणि काश्मिर -
अंफला येथील जिल्हा कारागृहातील कोविड पॉझिटिव्ह आलेल्या 28 कैद्यांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या, कारागृहातील सक्रिय प्रकरणांची संख्या चारवर आली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.