महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - india corona news

सलग तिसर्‍या दिवशी २४ तासांच्या कालावधीत दहा लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. ३० जानेवारी रोजी दररोज केवळ दहा चाचण्या घेण्यापासून, दैनंदिन चाचण्यांची सरासरी ११ लाखाहून अधिक झाली आहे, असे मंत्रालयाने सांगितले. चाचण्या घेणाऱ्या प्रयोगशाळातही वाढ झाली आहे. सध्या सरकारी क्षेत्रात १,०२२ आणि खासगी क्षेत्रात ६०१ प्रयोगशाळा आहेत, असे मंत्रालयाने सांगितले.

COVID-19 news from across the nation
भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

By

Published : Sep 4, 2020, 12:10 AM IST

हैदराबाद -भारतात बुधवारी कोरोनाव्हायरसच्या ११ लाख ७२ हजार १७९ चाचण्या घेण्यात आल्या असून एकूण चाचण्या ४.५ कोटींवर पोहोचल्या आहेत. जागतिक पातळीवर घेण्यात येणाऱ्या सर्वाधिक चाचण्यांपैकी या एक असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

सलग तिसर्‍या दिवशी २४ तासांच्या कालावधीत दहा लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. ३० जानेवारी रोजी दररोज केवळ दहा चाचण्या घेण्यापासून, दैनंदिन चाचण्यांची सरासरी ११ लाखाहून अधिक झाली आहे, असे मंत्रालयाने सांगितले. चाचण्या घेणाऱ्या प्रयोगशाळांतही वाढ झाली आहे. सध्या सरकारी क्षेत्रात १,०२२ आणि खासगी क्षेत्रात ६०१ प्रयोगशाळा आहेत, असे मंत्रालयाने सांगितले.

देशातील कोरोना आकडेवारी..

दिल्ली -

नवी दिल्ली : दिल्लीतील कोरोनाची वाढती प्रकरणे ही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा भाग नाहीत. दिल्लीत अजूनही कोरोना आहे, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी सांगितले.

"ही दुसरी लाट असल्याचे आपण म्हणू शकत नाही. एक किंवा दोन महिने कोरोनाची प्रकरणे नसती आणि त्यानंतर प्रकरणे उद्भवली असती, तर आपण त्यास दुसरी लाट म्हणू शकलो असतो. बुधवारी दिल्लीतील कोरोना मृत्यूचे प्रमाण ०.७५ टक्के होते. हे चांगले संकेत आहेत'', असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्ली सरकारने ९ सप्टेंबरपासून बार, रेस्टॉरंट्स आणि पब पुन्हा उघडण्यास मान्यता दिली आहे. दिल्ली लेफ्टनंट जनरल अनिल बैजल यांनी या आदेशास मान्यता दिली आहे.

हिमाचल प्रदेश

शिमला : हिमाचल प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्रसिंग ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या चार दिवसांपूर्वी ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. ७० वर्षीय महेंद्रसिंग यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना स्वत:ला वेगळे ठेवण्यासाचे आणि कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले.

मंडीच्या धरमपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार असलेले महेंद्रसिंग म्हणाले, की प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी केली.

मध्य प्रदेश

भोपाळ : भाजप महिला मोर्चाच्या नेत्या आणि शिवपुरी जिल्हा उपाध्यक्ष यांचे गुरुवारी कोरोनाव्हायरसमुळे निधन झाले. ३१ ऑगस्ट रोजी त्यांना विनायक रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

राजस्थान

जयपूर : राजस्थान सरकारने मुख्यमंत्री, राज्यमंत्री, आमदार, अखिल भारतीय राज्य सेवा अधिकारी आणि इतर राज्य कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दरमहा मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचा सात दिवसांचा पगार कापला जाईल. आमदारांचा एका दिवसाचा पगार कापला जाईल.

या व्यतिरिक्त, अखिल भारतीय आणि राज्य सेवा अधिकाऱ्यांच्या एकूण पगारामधून दरमहा दोन दिवसांचे वेतन आणि अधीनस्थ सेवा अधिकारी आणि इतर राज्य कर्मचार्‍यांच्या एकूण पगारामधून एका दिवसाचा पगार कापण्यात येईल.

हे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले जातील. ही कपात सप्टेंबर 2020 पासून केली जाईल.

ओडिशा

भुवनेश्वर : ओडिशाच्या वस्त्रोद्योग व हस्तकला मंत्री पद्मिनी दियान यांना कोरोनाची लागण झाली आहे. दियान या कोरोनाची लागण झालेल्या राज्यातील तिसऱ्या मंत्री आहेत.

यापूर्वी उच्च शिक्षण मंत्री अरुण कुमार साहू आणि कामगार मंत्री सुसंत सिंग यांना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details