महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रुग्णवाढीचा उच्च्चांक.! देशात गेल्या २४ तासांमध्ये ४९ हजार ३१० कोरोना रुग्णांची नोंद - कोरोना रुग्णसंख्या भारत

शुक्रवारी देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येतील उच्चांकी वाढ नोंदवली गेली. मागील २४ तासांमध्ये ४९ हजार ३१० नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या १२ लाख ८७ हजार ९४५ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.

COVID-19 news from across the nation
कोरोना अपडेट भारत

By

Published : Jul 25, 2020, 5:34 AM IST

हैदराबाद - देशात कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असले, तरी दररोज वाढणारी केरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येतील उच्चांकी वाढ नोंदवली गेली. मागील २४ तासांमध्ये ४९ हजार ३१० नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या १२ लाख ८७ हजार ९४५ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.

देशात गेल्या २४ तासांमध्ये ४९ हजार ३१० कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्र -

  • मुंबई - महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार ७१४ कोरोना रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत १ लाख ९९ हजार ९६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी ९ हजार ६१५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर २७८ मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी ५ हजार ७१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५७ हजार ११७ अशी झाली आहे. यापैकी १ लाख ९९ हजार ९६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची लागण होऊन १३ हजार १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -राज्यात शुक्रवारी ९ हजार ६१५ कोरोनाबाधितांची नोंद, २७८ मृत्यू

दिल्ली -

  • नवी दिल्ली - भारतीय बनावटीच्या कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी आज(शुक्रवार) सुरु करण्यात आली आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स(एम्स) मध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु झाली आहे. आज एका 30 वर्षीय व्यक्तीला लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

मागील आठवड्यापासून क्लिनिकल ट्रायलसाठी एम्स रुग्णालयात साडेतीन हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. यातील 22 जणांची शारिरीक तपासणी सुरु करण्यात आली आहे, असे एम्स रुग्णालयातील लसीच्या अभ्यासाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी सांगितले.

लसीच्या पहिल्या टप्प्यात 375 स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. यातील 100 जण दिल्लीतील एम्समधील असतील. पहिल्या टप्प्यात 18 ते 55 वयोगटातील स्वस्थ व्यक्तींना लस देण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला दुसरी शारिरीक व्याधी नाही. तसेच गर्भवती नसलेल्या महिलांनाही चाचणीत समाविष्ठ करुन घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 12 ते 65 वयोगटातील 750 जणांना लसीचा डोस देण्यात येणार आहे.

बिहार -

  • पाटणा - राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास सक्षम ठरत नसल्याचे मत नोंदवत पाटणा उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. तसेच, न्यायालयाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राज्यातील परिस्थितीबाबत अहवाल सादर करण्यात सांगितले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी राज्यात पाच हजार नव्या खाटा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी राज्यात १,८२० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३३ हजारांहून अधिक झाली आहे.

झारखंड -

  • रांची - झारखंड उच्च न्यायालयानेदेखील राज्य सरकारला कोरोना परिस्थितीबाबत फटकारले आहे. न्यायालयाने परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ७,२५० रुग्णांची नोंद झाली आहे, तर कोरोनमुळे ७१ रुग्णांचा बळी गेला आहे.

उत्तराखंड

  • डेहराडून - राज्यात आतापर्यंत ५,७१७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ३,४७९ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत ६२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details