हैदराबाद - देशातील कोरोनाची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर पोहोचली आहे. सोमवारी 19 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत कोरोना रुग्णसंख्येत भारताने रशियाला मागे टाकत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशात सद्यस्थितीत 2 लाख 53 हजार 287 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 4 लाख 24 हजार 433 जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती. राजधानी दिल्लीत सोमवारी 1 हजार 379 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर यासोबतच दिल्लीतील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 823 वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत याठिकाणी एकूण 25 हजार 620 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर, 72 हजार 88 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यात आतपर्यंत एकूण 3 हजार 115 बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा बरे होण्याचा दर 71 टक्के इतका आहे.
राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता त्याच्यावर मात करण्यासाठी ग्वालियार प्रशासनाने एक नवीन युक्ती काढली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे, मास्क न घालणारे आणि सरकारद्वारा जाहीर करण्यात आलेल्या नियमावलींचे पालन न करणाऱ्यांना आता तीन दिवस कोरोना स्वयंसेवक म्हणून काम करावे लागणार आहे.
ग्वालियरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी किल कोरोना या अभियानाअंतर्गत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आदेश काढला. ग्वालियरमध्ये सोमवारी 64 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली.
राज्य सरकारने खासगी लॅबसाठी कोरोना तपासणीचे दर ठरवले आहेत. सरकारने कोरोना चाचणीसाठी 2 हजार 500पासून 3 हजारपर्यंतचे दर ठरवले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 284 वर पोहोचली आहे. तर 617 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरतमध्ये 13 जुलैपर्यंत डायमंड पॉलिशिंग कंपन्या बंद राहणार आहेत. सोमवारी सुरत महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हा आदेश जारी केला. आणखी एक अधिसूचना जारी करण्यात आली असून एक किंवा त्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले तर गारमेन्ट कंपन्या, कपडा बाजार सात दिवस बंद राहील, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत सुरतमध्ये 570हून अधिक हीरा कर्मचारी आणि त्यांचे परिवारातील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची एकूण संख्या 5 हजार 500 आहे. राज्यातील अहमदाबादनंतर सर्वात जास्त बाधितांची संख्या सुरत येथे आहे.
पटना येथे कंटेनमेंट झोनची संख्या वाढवून ती 83वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 12 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आतापर्यंत 97 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
झारखंड पोलीसात ही कोरोनाबाधित आढळले आहेत. सोमवारी रांची येथील एका सहायक उपनिरीक्षकासहित चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात एक पोलीस कर्मचारी राष्ट्रीय जनता दलचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता. तर शनिवारीही रांची येथे पाच आणि लोहरदगा येथे तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला एक सहायक उपनिरीक्षकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र, दिलासादायक बाब ही की, हा पोलीस अधिकारी सुटीवर होता. सेवेत पुन्हा रुजू होताना त्याने आधी कोरोना तपासणी केली. त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर, राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 815 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 2 हजार 45 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील दौसा जिल्ह्यात तीन बॅंक कर्मचाऱ्यांसह एकूण 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बँकेचे एक व्यवस्थापक आणि दोन उपव्यवस्थापक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ग्राहकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 20 हजार 164 वर पोहोचली आहे.