हैदराबाद- भारतात शुक्रवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांची भर पडली. मागील 24 तासात देशभरात तब्बल 20 हजार 903 नवे रुग्ण आढळले आहे. या वाढीव संख्येसह देशातील कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 25 हजार 544 इतकी झाली आहे. यात 2 लाख 27 हजार 439 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 3 लाख 79 हजार 891 जण कोरोनामुक्त झाले आहे. 18 हजार 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली -
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारने केलेल्या यशस्वी नियोजनामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे म्हटलं आहे. 23 जून रोजी दिल्लीत सर्वाधिक 3 हजार 947 नवे रुग्ण आढळून आले होते. पण त्यानंतर दिवसागणिक ही संख्या कमी होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी कठोर पाऊल उचलत योग्य त्या उपाययोजना केल्याचे केजरीवाल म्हणाले. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी नियोजनाच्या बैठकींचा सपाटा लावला होता.
------------------------------------------
बिहार -
बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील पालीगंज येथे विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा तापामुळे मृत्यू झाला. तेव्हा नातेवाईकांनी कोरोना चाचणी न करताच त्या तरुणाचे अंत्यसंस्कार केले. यानंतर त्या लग्नाला हजर असलेल्या 100 पाहुण्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 50 हून अधिक लोकांवर मास्क न घातल्याचा तसेच फिजीकल डिस्टन्सिंग न ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी ऑगस्टपर्यंत सर्व शिव मंदिर बंद राहतील, असे बिहार राज्य धार्मिक ट्रस्ट परिषदेने स्पष्ट केले आहे.
------------------------------------------
राजस्थान -
प्रतापगड जिल्ह्यातील कारागृहात कोरोनाचे रुग्ण आढळले. यानंतर या कैद्यांचा संपर्क इतराशी आल्याचे समोर आले आहे. या कैद्याच्या संपर्कात आलेल्या 31 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने सर्व कर्मचारी आणि कैद्याची तपासणी केली आहे. तसेच आयसोलेशन वार्ड तयार करण्यासंदर्भात नियोजन सुरू केले आहे. या दरम्यान, कारागृह परिसर सील करण्यात आला आहे.
------------------------------------------
कर्नाटक -
राज्य आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे आनंद राव सर्कल येथील आरोग्य विभागाचे मुख्य कार्यालय सील करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्तांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यालय आणि त्याचा परिसर सॅनिटाईज केला जात असून कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध सुरू आहे.
------------------------------------------
उत्तर प्रदेश -