हैदराबाद - तेलंगाणा पोलिसांनी चालू केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर शेवटच्या तीन दिवसांत तब्बल ६ लाख ४१ हजार ९५५ कॉल प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवारा, जीवनावश्यक वस्तू इतर आवश्यक वस्तुंबाबत कोणतीही अडचण असल्यास 100 क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन, तेलंगाणा पोलिसांनी केले होते. पोलीस महासंचालक (डीजीपी) एम. महेंद्र रेड्डी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
तेलंगाणा पोलिसांना तीन दिवसात तब्बल सहा लाख कॉल - telangana police
लोकांनी ताण न घेता घरातच बसावे तसेच घाबरूनही जावू नये. ही आपली महत्त्वाची परीक्षा आहे. ती आपल्याला पास करायची असल्याचे रेड्डी म्हणाले.
लोकांनी ताण न घेता घरातच बसावे तसेच घाबरूनही जावू नये. ही आपली महत्त्वाची परीक्षा आहे. ती आपल्याला पास करायची असल्याचे रेड्डी म्हणाले. तसेच बोरगाव येथे एक बैठक घेऊन ताणतणावावर समुपदेशनासाठी एक टीम तयार केली आहे, जी नागरिकांना सतत धीर देण्याचे काम करेन.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकतेच आरोग्य आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित लोकांच्या सेवेचा उपयोग नागरिक करू शकतात. राज्यात जेवणाशिवाय कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही, असे सांगितले होते. त्यांच्या घोषणेनंतर स्वयंसेवकांच्या सहकार्याने पोलीस कर्मचारी राज्यभरातील गरजू लोकांना अन्न आणि आवश्यक वस्तूंचे वितरण करीत आहेत.