भोपाळ -येथील एम्समध्ये आपत्कालीन कर्तव्यावरुन परत येत असलेल्या एका महिलेसह तरुण डॉक्टरांच्या गटाला पोलिसांनी लाठीणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी संध्याकाळी ते एम्सच्या गेटमधून बाहेर पडले आणि त्यांच्या घराकडे जायला लागले. दरम्यान, परिसरात बॅरेकेटिंग करणार्या पोलिसांनी त्यांच्यावर निर्दयपणे हल्ला केल्याची माहिती आहे.
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास दक्षिण भोपाळच्या भागात पोलीस अधीक्षक साई कृष्णा हा एका कॉन्स्टेबलबरोबर कर्तव्यावर होता. दरम्यान, काही विक्रेते एम्स रुग्णलयाजवळ भाजी विकत असून येथे गर्दी होत असल्याचा त्यांना फोन आला. या फोननंतर कर्तव्यावर असलेले दोघेही एम्स रुग्णालयाकडे जाऊन गर्दीला पळवून लावत होते. दरम्यान, तेथे जवळच दोन डॉक्टर हे सामान्य कपड्यांमध्ये दूध विकत घेत होते. त्यामुळे पोलिसांना ते डॉक्टर असल्याचे ओळखणे कठिण झाले, आणि त्यांच्यावरही लाठीमार केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
तर, दुसरीकडे रीतू जी त्यावेळी आपल्या सहकार्यांबरोबर उपस्थित होती तिने, आम्ही अॅप्रन घालून होतो, आम्ही पोलिसांना आयडी कार्डही दाखवले. तसेच आमच्याबरोबर अन्य कर्मचारीही उपस्थित होते, असे डॉक्टारांचे म्हणणे आहे. मात्र, तरीही त्यांनी आमच्या हातातील साहित्य फेकून दिले आणि तूमच्यापासून आम्हालाही कोरोना होईल, असे म्हणत विनाकारण शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचे सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या डॉक्टरांवर एम्स रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. तर, यावेळी तेथे उपस्थित काही मित्रांनी घायाळ डॉक्टरांवरील उपचारादरम्यान घडलेल्या घटनाक्रमाबाबत विचारताना त्यांच्या आवाजाचे रेकॉर्डिंगही केले.
याप्रकरणी एम्स रुग्णालयाचे संचालक सरमन सिंग यांनी या घटनेकडे डोळेझाक केली असल्याचेही दिसून आले. ते यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले, “पोलिसांविरुद्ध आमचा कोणताही राग नाही. कारण, त्यांच्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि गुन्हेगारांविरुद्ध तत्काळ कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. "डॉक्टरांना कोणतीही मोठी जखम किंवा दुखापत झालेली नाही. या महामारीशी लढा देताना डॉक्टर आणि पोलीस एकाच पानावर आहेत. या परिस्थितीशी लढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दोन खांबांमधील सौहार्दपूर्ण संबंध आम्हाला हवे आहेत," असे ते म्हणाले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी ट्विट करुन या घटनेवर आक्षेप नोंदवला. "एका महिला डॉक्टरसह दोन पीजी डॉक्टरांना मारहाण केल्याचे अहवाल समोर आले आहेत. हे अत्यंत लज्जास्पद आहे. आपल्या जीवाला धोका निर्माण करुन साथीच्या काळात लोकांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आम्हाला अभिमान आहे." असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच, या घटनेची त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, जेणेकरुन अशा घटना भविष्यात घडणार नाही, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.