महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्य दिन : कोविड -19 चा आगरतळा येथील ध्वज निर्मिती व्यवसायाला फटका

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळणाऱ्या आगरतळा येथील ध्वज निर्मात्यांनी सांगितले की, या वर्षी त्यांना कोणत्याही ऑर्डर्स मिळाल्या नाहीत आणि किरकोळ विक्रीलाही मोठा फटका बसला आहे. एएनआयशी बोलताना स्वपन साहा या ध्वज निर्मात्या व्यावसायिकाने ही माहिती दिली.

ध्वज निर्मिती व्यवसाय
ध्वज निर्मिती व्यवसाय

By

Published : Aug 8, 2020, 8:06 PM IST

आगरतळा (त्रिपुरा) - स्वातंत्र्य दिन तोंडावर आला असताना कोविड-19 महामारी आणि पाठोपाठ लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे झेंडे तयार करण्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. याचा दुकानदारांसह येथील कामगारांनाही फटका बसला आहे.

आगरतळा येथील ध्वज निर्मिती व्यवसायाला फटका

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळणाऱ्या आगरतळा येथील ध्वज निर्मात्यांनी सांगितले की, या वर्षी त्यांना कोणत्याही ऑर्डर्स मिळाल्या नाहीत आणि किरकोळ विक्रीलाही मोठा फटका बसला आहे. एएनआयशी बोलताना स्वपन साहा या ध्वज निर्मात्या व्यावसायिकाने ही माहिती दिली.

‘मागील 30 वर्षांपासून आम्ही ध्वज तयार करत आहोत. माझ्याशिवाय आणखी चार-पाच जण येथे काम करतात. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर लागू झालेले लॉकडाऊनमुळे सध्या मी एकटाच काम करत आहे आणि आतापर्यंत जवळपास पाचशेच ध्वज बनवू शकलो आहे. सुरुवातीला मी माझ्या दुकानातच सर्व काम करत असायचो. मात्र, लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने माझ्या घरातच मी झेंडे तयार करत आहे,’ असे साहा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details