महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमुळे गहू कापणीला मजूर मिळाले नाही, शेतकऱ्याची आत्महत्या - up news

रामभवन शुक्ला (वय 52 वर्षे) या शेतकऱ्याने उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील जारी या गावी एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. गव्हाच्या पीक काढणीसाठी मजूर न मिळाल्याने वैतागून त्यांनी हे पाऊल उचलले.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Apr 12, 2020, 4:55 PM IST

बांदा (लखनऊ) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे शेतात काम करण्यासाठी मजूरही मिळत नाही. गव्हाच्या पीक कापणीसाठी मजूर न मिळाल्याने एका शेतकऱ्या गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना जारी (जि. बांदा, उत्तर प्रदेश) येथे घडली आहे.

रामभवन शुक्ला (वय 52 वर्षे), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक लाल भारतकुमार यांनी दिली.

मृताच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रामभवन शुक्ला हे गेल्या काही दिवसांपासून मजुरांचा शोध घेत होते. पण, टाळेबंदीमुळे एकही मजूर त्याच्या शेतात काम करण्यात तयार झाला नाही. शनिवारी (दि. 11 एप्रिल) ते मजुरांच्या शोधात घराबाहेर गेले. पण, ते परत आलेच नाही. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर शेतकऱ्याचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -लॉकडाऊनमुळे गोरगरीबांचे जीवन विस्कळीत, शासनाकडून मदतीची अपेक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details