नवी दिल्ली -जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे रुग्ण देशातही दिवसेंदिवस वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा ओलांडला असून मागील 24 तासांत 28 हजार 498 नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशात कोरोनाचे एकूण रुग्ण 9 लाख 6 हजार 752 झाले आहेत. यातील 3 लाख 11 हजार 565 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 71 हजार 459 जण उपचारानंतर बरे झाले असून घरी सोडण्यात आले आहेत.
देशभरात मागील 24 तासांत 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 23 हजार 727 झाली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर 63.02 टक्के आहे. तर बरे होणारे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण 96.01 : 3.99 एवढे आहे.