नवी दिल्ली - फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या देशातील नागरिकांना आता भारताचा व्हिसा किंवा ई-व्हिसा मिळणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष आरोग्य सचिव संजीव कुमार यांनी ही माहिती दिली. याआधी सरकारने इटली, इराण, दक्षिण कोरिया, जपान आणि चीनच्या नागरिकांना देण्यात येणारा व्हिसा बंद केला होता.
यासोबतच चीन, हाँगकाँग, कोरिया, जपान, इटली, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, इराण, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून परतलेल्या नागरिकांनी परतल्यापासून सुमारे १४ दिवस स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवावे. या १४ दिवसांमध्ये त्यांनी घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे, असेही सरकारने सुचवले आहे.