महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 India tracker: पाहा देशातील कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी - कोरोना आकडेवारी भारत

देशभरामध्ये कोरोनाच कहर अजूनही सुरूच आहे. मागील २४ तासांत देशात १२२ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

COVID-19 India tracker
कोरोना आकडेवारी

By

Published : May 13, 2020, 11:59 AM IST

नवी दिल्ली -देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७४ हजार २८१ वर पोहचला आहे. तर २ हजार ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे २४ हजार ४२७ रुग्ण आढळून आले आहेत. तर त्याखालोखाल गुजरातमध्ये ८ हजार ९०३ रुग्ण संख्या झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.

कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी

देशभरामध्ये कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. मागील २४ तासांत देशात १२२ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्याबरोबरच अर्थव्यवस्था सावरण्याचे दुहेरी आव्हान सरकारपुढे आहे.

हेही वाचा -Global COVID-19 tracker: जगभरात कोरोनामुळे २ लाख ८७ हजार ३३२ रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details