महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

INDIA COVID-19 TRACKER : देशभरामध्ये कोरोनामुळे 2 हजार 109 जण दगावले...

महाराष्ट्रामध्ये 20 हजार 228 कोरोनाबाधित असून 779 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 7 हजार 796 कोरोनाबाधित असून 472 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 6 हजार 542 कोरोनाबाधित तर 73 जणांचा मृत्यू झाला आहे.

COVID-19 India tracker
COVID-19 India tracker

By

Published : May 10, 2020, 11:48 AM IST

नवी दिल्ली -जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 62 हजार 939 झाला आहे, यात 41 हजार 472 अ‌ॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 19 हजार 357 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 2 हजार 109 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्णाची आकडेवारी

महाराष्ट्रामध्ये 20 हजार 228 कोरोनाबाधित असून 779 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 7 हजार 796 कोरोनाबाधित असून 472 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 6 हजार 542 कोरोनाबाधित तर 73 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान कोरोना विषाणूवर पूर्णपणे भारतीय बनावटीची लस तयार करण्यासाठी भारत बायोटेक कंपनी पुढे सरसावली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या कंपनीसोबत करार केला आहे. ज्यानुसार आता या दोन्ही संस्था एकत्रितपणे कोरोनाच्या लसीवर संशोधन करणार आहेत.

कधी संपते कोरोना साखळी -

एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसात एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details