महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#COVID-19 चा भारत आणि जगावर होणारा परिणाम आणि दक्षिण कोरिया मॉडेल,WHO ची चिंता

नावीन्यपूर्ण नवनवीन औषधांच्या निर्मीतीची जगभरात पेटंट घेण्याची संख्या वाढत आहे. पण ती औषधे मक्तेदारीमुळे सर्वत्र पोहोचू शकत नाहीत. अत्यावश्यक उपचारासाठी स्वामित्व हक्काबाबत सार्वजनिक धोरण ठरवण्याची गरज असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

COVID-19 Impact on India and globe, SKorea model and WHO's concerns
#COVID-19 चा भारत आणि जगावर होणारा परिणाम आणि दक्षिण कोरिया मॉडेल,WHO ची चिंता

By

Published : Apr 4, 2020, 12:30 PM IST

हैदराबाद - कोरोना विषाणूचा जगातील विविध देशांमध्ये प्रसार झाला आहे. दहा लाखांपेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झालाय. अशा स्थितीत चार मुद्यांची माहिती घेणे गरजेचे आहे.

कोरोनाचा भारत आणि जगावरील परिणाम

भारतात तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे भारतातील रुग्णांची संख्या दोन हजारांच्या वर पोहोचली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2069 इतकी असल्याची माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 219 आहे.

#COVID-19 चा भारत आणि जगावर होणारा परिणाम आणि दक्षिण कोरिया मॉडेल,WHO ची चिंता

संपूर्ण जगात कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पूर्ण केला असल्याचे जॉन्स होपकिन्स विद्यापीठाची आकडेवारी सांगते. कोरोनाच्या 1015403 रुग्णांवर जगभरात उपचार सुरु आहेत. त्यापैकी 53053 जणांचा मृत्यू झालाय. 210579 लोक कोरोनातून बरे झाले आहेत अशी माहिती झिनुआ वृतससंस्थेने दिली आहे.

अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. 245213 जण कोरोनाबाधित आहेत तर 5983 जणांचा मृत्यू झालाय. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू 13915 झाले असून 115242 जण कोरोनाबाधित आहेत. स्पेन मध्ये 112065 जणांना कोरोनाची लागण झालीय तर 10348 जणांचा मृत्यू झालाय.

जागतिक आरोग्य संघटनेची चिंता

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केलीय. अत्यावश्यक औषधे आणि गरजा पुरवण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. वैश्विक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी 2030 पर्यंत दोन अब्ज लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे जागतिक आरोग्यसंघटनेने म्हटले आहे.

नावीन्यपूर्ण नवनवीन औषधांच्या निर्मितीची जगभरात पेटंट घेण्याची संख्या वाढत आहे. पण ती औषधे मक्तेदारीमुळे सर्वत्र पोहोचू शकत नाहीत. अत्यावश्यक उपचारासाठी स्वामित्व हक्काबाबत सार्वजनिक धोरण ठरवण्याची गरज असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दक्षिण कोरियातील कोरोनाचा प्रसार

सेऊलमधील पहिले 30 रुग्ण सापडेपर्यंत सामान्यपणे याकडे पाहिले गेले मात्र 31 वा रुग्ण सापडल्यानंतर चक्र फिरली. 31 वा रुग्ण सापडल्यानंतर कोरोनाचा प्रसार थांबवणे अवघड झाले असल्याचे आम्हाला समजले. युरोपियन देशांसारखी आमच्या देशातील स्थिती होत आहे याची आम्हाला जाणीव झाली. असे दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री कंग क्युंग व्हा यांनी जागतिक आर्थिक मंचाच्या कोरोना टास्क फोर्स मिटींग मध्ये सांगतिले.

31 व्या रुग्णाने सेऊल आणि देअगू यासारख्या मोठ्या शहरांतून प्रवास केल्यामुळे त्याच्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग होणार याची जाणीव झाली होती. यांनंतर दक्षिण कोरियात कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली. तीन लाख पन्नास हजार जणांची तपासणी करण्यात आली तर काही जणांची पुन्हा पुन्हा चाचणी करण्यात आली, अशी माहिती कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.अमेरिका, इटली, ब्रिटन, दक्षिण कोरिया यांनी लॉकडाऊन न करता शाळा बंद केल्या आहेत.

कोरोना आणि सामान्य ताप

कोरोनाचा प्रसार संसर्गाद्वारे होत आहे. सामान्य तापाची लक्षणे ही दिसून येतात. मात्र कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details