महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19: मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे वैध समजली जाणार - केंद्रीय वाहतूक मंत्रालय

लॉकडाऊनमुळे अनेक वाहनांच्या कागदपत्रांची मुदत संपली आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांची वैधता वाढविण्यात आली आहे.

file pic
संग्रहीत छायाचित्र

By

Published : May 6, 2020, 2:04 PM IST

नवी दिल्ली -देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने वाहनांच्या कागदपत्रांचे नुतनीकरण, वैधता आणि इतर कामे रखडली आहेत. त्यामुळे मुदत संपलेली कागदपत्रेही वैध ठरविण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. ३० जूनपर्यंत कागदपत्रांची वैधता वाढविण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक वाहनांच्या कागदपत्रांची मुदत संपली आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांची वैधता वाढविण्यात आली आहे. १ फेब्रुवारी २०२० ते ३० जून २०२० दरम्यान वैधता संपलेली वाहनांची विविध कागदपत्रे वैध समजली जाणार आहेत.

'लॉकडाऊनमुळे वाहनचालकांना कागदपत्रांचे नुतनीकरण करता येत नाही. त्यामुळे १ फेब्रुवारी २०२० ते ३० जून २०२० दरम्यान वैधता संपलेली कागदपत्रे वैध ठरवली जातील' अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतून मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details