महाराष्ट्र

maharashtra

कोरोनामुळे टिकाऊ उर्जा उपाययोजनांचा विस्तार करण्याची निकड

By

Published : May 30, 2020, 4:19 PM IST

मागील काही दशकात मोठी प्रगती केली असली, तरी उर्जा संकट येणार असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीने याबाबत एनर्जी प्रोग्रेस रिपोर्ट प्रकाशित केला आहे, आंतरराष्ट्रीय पुनरऊर्जा एजन्सी, संयुक्त राष्ट्र सांख्यिकी विभाग आणि वर्ल्ड बँक आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही ऊर्जा संकटाबाबत अहवाल प्रकाशित केले आहेत.

उर्जा स्त्रोत
उर्जा स्त्रोत

हैदराबाद - कोरोनाच्या प्रसारामुळे जगभर मानव अडचणींचा सामना करत आहे. अशातच ऊर्जा संकटही समोर उभे ठाकले आहे. परवडणारी, विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा मिळवण्यात जगाचे प्रयत्न कमी पडतील, असे चित्र आहे. जर आपण प्रयत्न केले नाही तर 2030पर्यंत ऊर्जेची चणचण भासेल.

मागील काही दशकात मोठी प्रगती केली असली, तरी उर्जा संकट येणार असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सी ने याबाबत एनर्जी प्रोग्रेस रिपोर्ट प्रकाशित केला आहे, आंतरराष्ट्रीय पुनर्रऊर्जा एजन्सी, संयुक्त राष्ट्र सांख्यिकी विभाग आणि वर्ल्ड बँक आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही ऊर्जा संकटाबाबत अहवाल प्रकाशित केले आहेत.

कोरोना संकट सुरू होण्यापूर्वी शाश्वत विकासाची 7 ध्येये पूर्ण करण्याचे काम प्रगती पथावर होते. मागील काही दिवसांत विजेचा पुरवठा न होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. शाश्वत ऊर्जेसह ऊर्जेची कार्यक्षमतही वाढली आहे.

एवढी प्रगती होऊनही 2030पर्यंत महत्त्वाची शाश्वत उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यास जागतिक स्तरावर प्रयत्न कमी पडत आहेत, असे आंतरराष्ट्रीय पुनरऊर्जा एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सर्व क्षेत्रांत आणि भागांत प्रगतीचा वेग वाढवायचा असल्यास प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दीर्घकालीन ऊर्जा नियोजन, खासगी अर्थ साहाय्य, योजना, प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. त्यामळे नव्या तंत्रज्ञानालाही चालना मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details