नवी दिल्ली -राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाल्याचा दावा केजरीवाल सरकारने केला आहे. मात्र, अजूनही शहरात तब्बल ८०३ कन्टेन्मेंट झोन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मागील दहा दिवसांमध्ये या यादीत २४३ झोनची भर पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार, २८ ऑगस्टपर्यंत दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे ३२१ कन्टेन्मेंट झोन आहेत. तर दिल्ली पश्चिम जिल्ह्यात २६६ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. त्याखालोखाल इतर पाच जिल्ह्यांत १०० पेक्षा जास्त कंन्टेन्मेंट झोन आहेत.