नवी दिल्ली -गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 37 हजार 148 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गंभिर बाब म्हणजे एकाच दिवसात 587 जणांना जीव गमावावा लागला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजार 191 झालू आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 2 हजार 529 आहे तर समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत 7 लाख 24 हजार 578 कोरोाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी देशामध्ये एकूण 3 लाख 33 हजार कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये एका दिवसात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 40 हजारांच्या घरात गेली आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या घेतल्या तर कोविड १९ विषाणूचा प्रसार होणार नाही. तसे केल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा लवकर सापडेल आणि त्याला इतर निरोगी लोकांपासून बाजूला करता येईल, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.