नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली राउज अव्हेन्यू न्यायालयाने बदनामीच्या खटल्या प्रकरणी समन्स बजावले आहेत.
मानहाणी प्रकरण : केजरीवाल व सिसोदिया यांना दिल्ली कोर्टाचे समन्स - case
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली राउज अव्हेन्यू न्यायालयाने बदनामीच्या खटल्या प्रकरणी समन्स बजावले आहेत.
दिल्ली राउज अव्हेन्यू न्यायालयाने दिल्ली विधानसभा विपक्ष नेता विजेंद्र गुप्ता यांच्या बदनामीच्या खटल्यासंबधीत सुनावणीसाठी केजरीवाल आणि सिसोदीया यांना समन्स बजावले आहेत. यासंबधीत सुनावणी येत्या 16 जुलैला होणार आहे.
याप्रकरणी 27 जुनला दीपक बंसल आणि अनुराग मलीक यांनी न्यायालयात आपली साक्ष नोंदवली होती. दीपक हे दिल्लीतील भारतीय जनता युवा मोर्चाचे सचीव आहेत. तर अनुराग दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहेत.
काय आहे प्रकरण ?
केजरीवाल आणि सिसोदीया यांनी प्रचारादरम्यान माझी बदनामी केली. त्यामुळे मला खुप त्रास झाला आहे. याचबरोबर माझी प्रतीमा मलीन करण्यासाठी त्यांनी आपल्या हत्येच्या कटामध्ये माझा हात असल्याचे सांगितेल होते, असे विजेंद्र गुप्ता यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी गुप्ता यांनी केजरीवाल आणि सिसोदीया यांना माफी मागण्यासाठी नोटीस देखील पाठवली होती. नोटीसचे उत्तर न मिळाल्यानंतर त्यांनी बदनामीचा खटला दाखल केला होता.