महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

...तर निकालाला विलंब होईल; निवडणूक आयोगाचे न्यायालयात स्पष्टीकरण

५० टक्के व्हीव्हीपॅट ईव्हीएमसोबत तपासायचे झाल्यास सक्षम स्टाफ आणि मतगणना हॉलची गरज भासेल. काही राज्यांमध्ये याची आताच कमतरता आहे, असेही आयोगाने सांगितले.

व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम

By

Published : Mar 30, 2019, 2:02 PM IST

नवी दिल्ली -व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के निकाल ईव्हीएमसोबत तपासल्यास लोकसभा निवडणूक निकालाला ५ दिवसांचा विलंब होईल, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनच्या निकालाची तुलना व्हावी, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने हे स्पष्टिकरण दिले.

५० टक्के व्हीव्हीपॅट ईव्हीएमसोबत तपासायचे झाल्यास सक्षम स्टाफ आणि मतगणना हॉलची गरज भासेल. काही राज्यांमध्ये याची आताच कमतरता आहे, असेही आयोगाने सांगितले. यासंदर्भात २१ विरोधी पक्षातील नेत्यांनी याचिका दाखल केलेली आहे. या तपासणीमुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शी बनून राहील, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

आता अशी होती तपासणी ?

सध्या निवडणूक आयोग कुठल्याही क्षेत्रातून ईव्हीएम मशीन निवडून त्यांच्या पावत्यांसोबत पडताळणी करून पाहतो. देशात एकूण १०.३५ लाख मतदान केंद्र आहेत. एका विधानसभा सीटमध्ये जवळपास २५० मतदान केंद्र आहेत. एका व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी सध्या एका मतदान केंद्रावर एका तासाचा कालावधी लागतो, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. जर याला ५० टक्क्यांनी वाढविले तर यामध्ये जवळपास ५ दिवस लागतील, असेही आयोगाने स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details