महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचे थैमान : भारताने रोखला इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाचा प्रवासी व्हिसा - coronavirus advisory

'इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाच्या नागरिकांचे व्हिसा भारताने स्थगित केले असले तरी, ज्यांना अत्यावश्यक कारणांसाठी भारतात यायचे आहे, त्यांनी ती कारणे सादर करून नवीन व्हिसासाठी अर्ज करावा,' असे या अ‌ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे.

कोरोनाचे थैमान
कोरोनाचे थैमान

By

Published : Mar 4, 2020, 8:26 AM IST

नवी दिल्ली - भारताच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाच्या नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांद्वारे कोरोनाचा संसर्ग भारतात पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर या देशांचे जे नागरिक अद्याप भारतात पोहोचलेले नाहीत, त्यांना मंजूर केलेले व्हिसा तात्पुरते स्थगित केले आहेत. मंत्रालयाने याबाबतची अॅडव्हायजरी मंगळवारी जारी केली.

'इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाच्या नागरिकांचे व्हिसा भारताने स्थगित केले असले तरी, ज्यांना अत्यावश्यक कारणांसाठी भारतात यायचे आहे, त्यांनी ती कारणे सादर करून नवीन व्हिसासाठी अर्ज करावा,' असे या अ‌ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे.

याआधी चिनी नागरिकांचे व्हिसा रोखण्याचा निर्णय झाला होता. तोही कायम ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, या नियमातून राजकीय नेते, संयुक्त राष्ट्रांचे आणि इतर आंतररराष्ट्रीय समुदायांचे अधिकारी व पदाधिकारी, ओसीआय कार्डधारक आणि विमानातील कर्मचारी यांना सूट देण्यात आली आहे. 'या सर्वांना वैद्यकीय तपासणीनंतर भारतात प्रवेश करू देण्यात येईल,' असे यात म्हटले आहे.

याशिवाय, सर्व आंतरराष्ट्रीय विमानांमधून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना सर्व विमानतळांवर आरोग्य अधिकारी, इमिग्रेशन अधिकाऱ्यांना स्वतःच्या एकूण प्रवासाविषयी माहिती देऊन याचे प्रतिज्ञापत्रही द्यावे लागणार आहे.

हेही वाचा - उत्तर प्रदेशातील जोडप्याला ओडिशाच्या रूग्णालयात केले दाखल; कोरोनाची लागण झाल्याचा संशय..

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण सर्वांत प्रथम चीनमधील वुहान प्रांतात आढळला होता. यानंतर जगभरातील देशांमध्ये या विषाणूचा वेगाने प्रसार झाला. सध्या भारतातही सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात राजधानी दिल्लीतील एकाचा समावेश आहे.

हेही वाचा - जयपूरमधील कोरोनाग्रस्त इटालियन नागरिकाच्या पत्नीलाही झाली विषाणूची लागण..

ABOUT THE AUTHOR

...view details