नवी दिल्ली - मध्य प्रदेश सरकार कोरोनाबाधित संख्या कमी दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक राज्यातील लोकांची कमी प्रमाणात कोरोना चाचणी करत असल्याचा आरोप मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी केला. केवळ इंदूर, भोपाळ, जबलपूर आणि काही मोठ्या शहरांमध्ये लोकांची चाचणी घेतली जात असल्याचे ते म्हणाले.
'मध्य प्रदेश सरकार जाणीवपूर्वक कमी प्रमाणात कोरोना चाचण्या करतयं' - कोरोना चाचण्या
मध्य प्रदेश सरकार कोरोनाबाधित संख्या कमी दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक राज्यातील लोकांची कमी प्रमाणात कोरोना चाचणी करत असल्याचा आरोप मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ केला.
राज्यात कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न पुरेशे नाहीत. काही प्रमुख शहरांमध्ये लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. मात्र, राज्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या वगळली जात आहे. जी स्थंलातरित कामगार शहराकडून गावाकडे जात आहेत. त्यांच्या कोरोना चाचणीचे काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमच्या सरकारने 28 जानेवरीलाच कोरोना संकटाविरोधात तयारी सुरु केली होती. त्यावेळी शिवराज यांनी आमची खिल्ली उडवली होती. सद्य परिस्थीमध्ये आमच्या सरकारने चांगले काम केले असते, असा दवा कमलनाथ यांनी केला.