नवी दिल्ली - मागील 24 तासांमध्ये देशभरातनव्याने 146 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोग्रस्तांचा आकडा 1 हजार 397 वर पोहचला आहे. यातील 124 रुग्ण बरे झाले असून 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 397 वर, नागरिकांनी सहकार्य न केल्यानं रुग्ण वाढले - आरोग्य मंत्रालय
महाराष्ट्रामध्ये आज एकाच दिवसात 72 रुग्ण आढळून आल्याने एकून रुग्ण 302 वर पोहचले आहेत. तर तामिळनाडूत आज 57 नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांचा आकडा 124 वर पोहचला आहे.
कोरोना रुग्ण भारत
विविध राज्यांतील स्थिती
महाराष्ट्रामध्ये आज एकाच दिवसात 72 रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण 302 वर पोहचले आहेत. तर तामिळनाडून आज 57 नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांचा आकडा 124 वर पोहचला आहे. ईशान्य भारतामध्ये तीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. नागरिकांनी सहकार्य न केल्याने रुग्णांचा आकडा वाढल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
- राजस्थानात आज 4 नवे रुग्ण आढळून आले. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 93
- बिहार राज्यात 5 आणखी रुग्ण, एकूण संख्या 21
- कर्नाटकात आज 13 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 101
- मध्य प्रदेशात 66 कोरोनाग्रस्त
- काश्मिरात 6 नवे रुग्ण आढळले. एकूण 55
- पश्चिम बंगालमध्ये 5 नवे रुग्ण आढळले. एकूण 27
- उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यांमध्ये 101 कोरोनाग्रस्त
- झारखंडमध्ये मलेशियन महिलेला कोरोना झाल्याचे तपासणीत स्पष्ट
- पंजाबमध्ये 41 कोरोनाग्रस्त, यातील तिघांचा मृत्यू
- आंध्र प्रदेशात 4 नवे रुग्ण, एकूण संख्या 44
- केरळमध्ये 7 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्त 215