नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीमधून कोरोनाबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गंगाराम रुग्णालयातील 108 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
वैद्यकीय कर्मचारीही कोरोनाच्या छायेत? रुग्णालयातील 108 जणांना केले 'होम क्वारंटाईन' - corona india
दिल्लीमधून कोरोनाबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गंगाराम रुग्णालयातील 108 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच 'होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे.
यामध्ये डॉक्टर, पारिचारिका यांचाही समावेश आहे. हे सर्व कर्मचारी दोन कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते. 108 पैकी 85 जणांना त्यांच्या घरातच क्वारंटाईन केले असून 23 जणांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्यांचेच विलिगीकरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांनी यातून धडा घेऊन काळजी घेण्याची गरज आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 902 झाली आहे. 184 रुग्ण बरे झाले असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून 68 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.