जयपूर - इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी काही भारतीयांना एअरलिफ्ट करून मायदेशी आणण्यात आले होते. यांपेैकी एकूण ४८४ नागरिकांना राजस्थानमधील जैसलमेर येथे उतरवण्यात आले होते. या सर्व भारतीयांची जैसलमेरमधील लष्करी तळावर तपासणी करण्यात येत होती, त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
या सर्वांच्या तपासणीचे अहवाल सोमवारी आले. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असले, तरी खबरदारी म्हणून सर्वांना १४ दिवस तेथेच विशेष कक्षामध्ये रहावे लागणार आहे. हे सर्व नागरिक लष्करी तळावरील तपासणी केंद्रावर असलेल्या सुविधांनी समाधानी असल्याची माहितीही समोर आली आहे.