नवी दिल्ली - जगभरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे एका कोरोनाबाधित रुग्णाने सॅनिटायझर प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर आहे.
कोरोनाबाधित रुग्णाचा सॅनिटायझर प्राशन करत आत्मत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर - कानपूर
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे एका कोरोनाबाधित रुग्णाने सॅनिटायझर प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर आहे.
दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी तरुणाला कानपूर येथील हाल्लेट्ट रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला सरसौल येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यावर गुरुवारी तरुणाने सॅनिटायझर प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे