वाराणसी-उत्तर प्रदेशच्या वाराणसीत एकाच दिवसात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. याशिवाय नुकताच एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याच घटनांमुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील रोहनियाच्या गंगापुर, दशाश्वमेधमधील मदनपुरा आणि लोहता या भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
वाराणसीत कोरोनाबाधिताचा मृत्यू, जिल्ह्यात संचारबंदी लागू
उत्तर प्रदेशच्या वाराणसीत एकाच दिवसात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. याशिवाय नुकताच एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याच घटनांमुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील रोहनियाच्या गंगापुर, दशाश्वमेधमधील मदनपुरा आणि लोहता या भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.
वाराणसीत कोरोनाबाधिताचा मृत्यू
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाला आधीपासूनच मधुमेह आणि रक्तदाबासारखे आजार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा रुग्ण राहात असलेल्या परिसराला पूर्णपणे सील करण्यात आले आहे.