नवी दिल्ली -राजधानीमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. लेडी हार्डिंग रुग्णालयातील एक डॉक्टर आणि ३ नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील कोरोनाचा आकडा ७ वर पोहोचला आहे.
लेडी हार्डिंग रुग्णालयातील एक डॉक्टर अन् ३ नर्सला कोरोनाची लागण - corona update delhi
दिल्लीमध्ये शनिवारी कोरोनाचे १८६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ८९३ वर पोहोचला आहे. तसेच शनिवारी एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीतील मृतांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे.
या रुग्णालयातील १० महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या वडिलांची चाचणी करण्यात आली, तर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासन चांगलेच हादरले. त्यानंतर रुग्णालयातील १ डॉक्टर आणि २ नर्सला कोरोनाची लागण झाली. आता पुन्हा १ डॉक्टर आणि ३ नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची यादी बनवली जात असून त्यांना क्वारंनटाईन करण्यात येणार आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये शनिवारी कोरोनाचे १८६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ८९३ वर पोहोचला आहे. तसेच शनिवारी एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीतील मृतांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे.