भुज (गांधीनगर) : मुळ गुजरात येथील मात्र सध्या मुंबईत राहत असलेल्या एका महिला डॉक्टरला स्वतःला कोरोना झाला असल्याचे माहित होते. असे असतानाही या डॉक्टरने मुंबई येथून आपल्या गावी भुजपर्यंत विनापास प्रवास केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या महिलेला गुजरातच्या स्थानिक प्रशासनाने रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह महिला डॉक्टरचा मुंबई ते गुजरातपर्यंत विनापास प्रवास... डॉक्टरवर गुन्हा दाखल... हेही वाचा...प्रकृती ठीक असल्याचे अमित शाहांनी केले स्पष्ट; 'हितचिंतकां'साठी दिला खास संदेश..
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल...
'ही महिला डॉक्टर मुंबई येथे वास्तव्यास होती. 3 मे रोजी तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्या चाचणीचा अहवाल 4 तारखेला कोरोना पॉझिटिव्ह असा आला होता. मात्र, तरिही या डॉक्टर महिलेने 4 तारखेला गुजरातला जायचे ठरवले आणि ती 5 मे रोजी गुजराच्या भुज येथे पोहचली. भुजला पोहचल्यावरही तिने आपल्याला कोरोना असल्याचे सांगितले नाही. तसेच अधिक तपासात या महिला डॉक्टरकडे मुंबई अथवा महाराष्ट्र सरकारचा कोणताही पास नव्हता. फक्त गांधीनगर प्रशासनाकडून एनओसी देण्यात आली होती. म्हणजेच या भुजपर्यंतचा प्रवास विनापास केला होता. त्यामुळे तिच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे' अशी माहिती भुजचे पोलीस अधीक्षक सौरभ तोलंबिया यांनी दिली.