नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये 445 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. मरकज कार्यक्रमाला 2 हजार 300 नागरिकांनी हजेरी लावली होती. त्यातील 500 जणांमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे दिसत आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून 1 हजार 800 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. सर्वांची कोरोणा चाचणी करण्यात येणार आहे, पुढील दोन-तीन दिवसात चाचण्यांचे निकाल येणार असून कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
येत्या दोन-तीन दिवसांत दिल्लीत कोरोनाग्रस्त वाढण्याची शक्यता - केजरीवाल - corona live
मरकज कार्यक्रमाला 2 हजार 300 नागरिक गेले होते. त्यातील 500 जणांमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे दिसत आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून 1 हजार 800 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे - केजरीवाल
दिल्लीतील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी फक्त 40 जणांना स्थानिक संसर्ग (लोकल ट्रान्समिशन) झाला आहे. इतर सर्व रुग्ण मरकज धार्मिक कार्यक्रमाला गेलेले किंवा परदशात जाऊन आलेले आहेत. त्यामुळे असे दिसून येते, की कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत नसून नियंत्रणात असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
एकूण रुग्णांपैकी 11 जण अतिदक्षता विभागामध्ये आहेत. तर 5 जण व्हेंटिलेटरवर आहेत. बाकी सर्वांची प्रकृची स्थिर आहे. काही स्थानिक भागांमध्ये कोरोनाची लागण झाली असून समाजात कोरोना पसरला नसल्याचे केजरीवाल म्हणाले.