नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णाने निराशेतून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नवी दिल्लीतील बत्रा रुग्णालयात घडली. ६३ वर्षीय रुग्णाला २० मे रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
धक्कादायक ; कोरोनाबाधिताची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या - लेटेस्ट न्यूज इन दिल्ली
दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ६३ वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचारा सुरू असताना तो कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे निराश होऊन या रुग्णाने पंख्याला गळफास घेतला.
रुग्णालयातील डॉक्टर
या रुग्णाला डायलिसीससाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर रुग्ण निराश होता. त्याला रुग्णालयातील ५११ क्रमांकाच्या खोलीत ठेवण्यात आले होते. मात्र नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल २० हजाराच्या वर गेला आहे. तर ५२३ नागरिकांचा आतापर्यंत बळी गेला आहे.