चेन्नई -राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये दोषी असलेला आरोपी, पेरारिवलन हा पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आहे. वेल्लोरच्या मुख्य तुरुंगात असलेल्या पेरारिवलनला वडिलांची प्रकृती ठीक नसल्याच्या कारणाने पॅरोल मिळाली आहे.
पॅरोलवर बाहेर असण्याची पेरारिवलनची ही दुसरी वेळ आहे. याआधी २०१७ मध्ये त्याला ३० दिवसांसाठी तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी मिळाली होती. त्याच्या आईने केलेल्या विनंतीनुसार, ही मुदत आणखी ३० दिवसांसाठी वाढवण्यात आली होती.
१९९१ च्या मे महिन्यात राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. तमिळनाडूमधील एका राजकीय रॅलीदरम्यान 'लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम' (एलटीटीई) या संघटनेच्या आत्मघातकी बॉम्बरने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात राजीव गांधी यांच्यासह आणखी १४ लोकांचा जीव गेला होता. या हल्ल्यात दोषी आढळलेल्या सर्वांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
हेही वाचा :अयोध्या खटला: पुनर्याचिका दाखल करण्याबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची १७ नोव्हेंबरला बैठक