नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या राजकारणाचे पडसाद देशपातळीवर उमटत आहेत. देशात 70 वा संविधान साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने दोन्ही सभागृहे संयुक्तपणे बोलाविली आहेत. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भाषण करणार आहेत. या कार्यक्रमावर शिवसेनेसह विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे.
संविधान दिनाच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेदेखील उपस्थित राहणार आहेत. तर संविधान दिनाचा कार्यक्रम सुरू असताना विरोधी पक्ष हे संसदेच्या आवारामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत.