नवी दिल्ली - भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. ती नुसता पानांचा गठ्ठा नसून, जगाच्या एकून लोकसंख्येपैकी ७ टक्के जनतेच्या आशा आकांक्षाचं रक्षण करणारा दस्तावेज आहे.
आपली राज्यघटना नागरिकांमध्ये कोणताही दुजाभाव न करता समानतेची आणि न्यायाची हमी देते. फक्त कायदे आणि नियमांपेक्षा राज्यघटनेचे महत्त्व काही वेगळेच आहे. तिच्यामुळे नागरिकांचा निश्चयीपणा, वचनबद्धता, सुरक्षा तर मिळतेच मात्र, त्यापेक्षाही मोठं म्हणजे आपल्याला मोठे ध्येय गाठण्याची प्रेरणा देते. भारतीय गुलामगिरीच्या जोखडात नुकतेच मुक्त झाले होते, त्यावेळी घटनाकारांनी स्वांतत्र्य, बंधुता आणि समानता जनतेला देण्यासाठी कौशल्य पणाला लावले, असे पंडित जवाहरलाल नेहरुंनी डिसेंबर १९४६ ला राज्यघटनेचा ठराव पास करताना म्हटले होते.
हेही वाचा -राज्यघटनेतील आशा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब म्हणजेच घटनेची प्रस्तावना..
समानता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्ये आपण फ्रान्सकडून घेतली. पंचवार्षिक योजना सोव्हिएत संघाकडून, मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडकडून आणि राज्यघटनेची कार्यपद्धती जपानच्या राज्यघटनेमधून घेतली. भारतीय राज्यघटना स्वीकारुन ७० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १५० जयंती भव्य साजरी करण्याचे मोदी सरकारने ठरवले होते. त्यानुसार २६ नोव्हेंबर या संविधान दिनी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा -भारताची घटना 'सर्वसमावेशक'; त्यामुळेच इतरांपेक्षा वेगळी अन् विशेष..
संविधान दिनाचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम साजरा केला जात असताना तत्कालीन राष्ट्रपती नारायणन यांनी सर्वांना आत्मापरीक्षण करण्यास सांगितले होते. राज्यघटना आपल्या अपयशास कारणीभूत आहे का? आपल्यामुळे राज्यघटना अपयशी ठरली? यावर आत्मपरीक्षण करा, असे ते म्हणाले होते.